#कथा_भाग_2
मावळा
“काय सांगता काय ? मग यादव
सरांनी काय केलं?”
‘सर,रस्त्यावरच्या लोकांनीच
सरकारी हॉस्पिटलला अॅडमीट केलं.ऑफिसमध्येच फोन आला,मग यादवसर स्वतः गेले
हॉस्पिटलला.’
“हां पुढे ?असं ब्रेक मारत
नका बोलू ओ जाधव,धडाधड सांगा काय आहे ते !”
मी न रहावून जाधववरच सरकलो
एकदम;माझी आधीच चिडचिड झाली होती.
माझ्या अनपेक्षित
डाफरण्यावर बिच्चारा जाधव एकदम कसनुसा झाला,
‘सर यादवसरांनी तानाजीचा
फॉर्म भरून स्वतःच्या मुलीला मोठ्या हॉस्पिटलला नेलं.तिला नव्हतं लागलं जास्ती,हातापायाला
थोडं खरचटलं होतं,गुढघ्याला जखम झाली आहे.पण तानाजीच्या डोक्याला मार लागला होता.यादव
सरांनी काही ऐकलं नाही,ते घाईत घेवून गेले मुलीला किशनचंद हॉस्पिटलला.मला आणि कुलकर्णीला
कॅश दिली आणि बघायला सांगितलं तानाजीकडे.डॉक्टर बोल्ले,केस सिरीयस आहे,ऑपेरेशन
करायला लागेल.,आणि तिथले मशीन खराब होतं.बाहेरच घेऊन जा म्हणाले.पोलीस कम्प्लेंट
पण झाली होती पण यादव सरांनी ते मिटवल’.
“जाधव मला एक सांगा,कि
अॅक्सीडेंट नेमका कसा आणि कोणामुळे झाला?
‘सर कोणाला सांगू नका,पण
सरांच्या मुलीची चूक होती,तानाजी तिला हाताला धरून शाळेच्या इथल्या फुटपाथवरून
चालत असतानाच ती काहीतरी दिसलं म्हणून तानाजीचा हात सोडून रस्त्यावर पळाली.समोरून
ट्रक येताना दिसला म्हणून तानाजी फक्त पटकन तिला वाचवायला म्हणून गेला.तिला घट्ट
धरून जाताना गाडीची धडक बसून तो रस्त्यावर पडला पण त्याने मुलीला अलगद बाजूला
ठेवलं’
“ओ माय
गॉड,म्हणजे तानाजीची काही चूक नव्हतीच तर ?
‘हो सर
बिलकुलच नव्हती,मुलीने आणि रस्त्यावर अॅक्सीडेंट बघणाऱ्या माणसानीपण असंच सांगितलं हे सगळं,तिला बाजूला
ठेवून मग बेशुद्ध पडला ते अजून तसाच आहे’.
त्याच्या
हातावरून गाडी गेली,हाडं मोडल्येत आणि डोक्याला धक्का बसलाय.
“बापरे मग शेवटी कुठे घेवून
गेलात त्याला?आत्ता काय स्टेटस आहे?”
सर ते दीनदयाळ आहे ना तिकडे
नेलं शेवटी.अजून कोणी घेतच नव्हतं.वेळ पण जात होता.मग यादव सरांनी दिलेले दहा हजार
भरले.आणि उपचार सुरु केले.आता स्टेबल आहे.पण डॉक्टर म्हणतायत ऑपेरेशन करायलाच
लागणारे.
“दिनदयाळला?नेमक ऑपेरेशन
आहे?कोण आहेत डॉक्टर?”
डॉक्टर के.के.शिंदे म्हणून
आहेत.तिथले मेन न्यूरोसर्जन आहेत.ते बोलतायत,केस क्रिटीकल आहे,मेजर आहे
ऑपेरेशन.हाय रिस्क आहे.हॉस्पिटलचा क्लार्क बोल्ला,डॉक्टर खूप बिझी असतात.बिल
आत्ताच पंचवीस हजार झालय.पेशंटच्या पेमेंटचा भरवसा कोण देणार?आजकाल ह्या क्लासमधल्या
मराठी माणसाला काही झालं तर लगेच तोडफोड करतात असं हॉस्पीटल स्टाफ बोलतो..
“मग तुझे यादवसर नाही का काही
बोल्ले?मी जाधववर उगाचच राग काढत म्हणलो.
‘यादवसर म्हणले,म्हणजे आधीचे
दहा हजार तर त्यांनीच दिलेत,पोलीसच त्यांनीच मिटवल.आता बाकी कंपनी काय देते बघू म्हणतायत.’जाधव
काही न समजून उलट यादवचीच बाजू लावत म्हणला.
“बुलशीट.हे सगळं त्याच्या
पोरीला सोडायला गेला म्हणून झालंय ना?आणि त्या पैश्याच्यासाठी काय एका माणसाचा जीव
घालवणार आहात का?आणि कंपनी अॅप्रुव्हल देणार त्यावेळी बघू म्हणजे काय?
तानाजीला घरच्या कामाला पाठवताना
काय कंपनीच्या हेडऑफिसची परवानगी घ्यायला गेला होता का यादव?आणि ह्या क्लास मधल्या
मराठी माणसाला म्हणजे काय?माय फुट..उगाचच काहीतरी फालतूपणा करू नका म्हणावं.बिल
सगळं भरू आपण.आता मी आलोय,बोलतो डॉक्टरांच्या बरोबर.नाव काय म्हणलात होतात तिथल्या
मेन सर्जनचे जाधव?”
‘केके शिंदे सर’
“ओके.केके शिंदे?”
अरेच्च्या केके शिंदे
म्हणजे आपला किश्या?किश्याच असणार.किशोर कृष्णराव शिंदे.आयला शाळेतली पाच आणि नंतर
ज्युनियर कॉलेज आणि हॉस्टेलची दोन अशी आख्खी सात वर्ष एकत्र काढल्येत आपण.नंतर आपण
इंजिनिअर आणि तो डॉक्टर.किश्याच असेल तर बास कामच झालं.असेल काय तोच असणार.मागच्या
रीयुनियनला म्हणाला होताच आता परत आलोय युएस वरून,इकडेच कुठेतरी जॉईन होतोय
म्हणून.हे बेस्ट झालं.चल किश्या असला म्हणजे एका बाजूची काळजी मिटल्यात जमा.आता
पुढच्या हालचाली लगेच करायला पाहिजेत.यादवच्या मिटींगला आहेत अजून १५ मिनिट.
”जाधव नंबर आहे का डायरेक्ट
डॉ.शिंदेंचा?नसेल तर हॉस्पिटलला लावून डॉ.शिंदेंना द्यायला सांगा बाहेर टीनाला.कमॉन
हरीअप नाऊ.”
आईशप्पथ,अजून काय घोळ घालून
ठेवलेत अजून ह्या यादवरावांनी कोणास ठाऊक?
‘सर,डॉ.शिंदे ऑन द लाईन’
“ओके,येस डॉ.केके शिंदे ना?सर
धिस इज रोल नंबर एटीन शेखर जोशी हिअर.”
‘शेखऱ्या तू ?माय गॉड,व्हॉट
अ कोइंसीडन्स.बिलीव्ह मी ऑर नॉट.आजच सकाळी तुझी आठवण काढली होती गावाकडून लाडू
भरून डबा आला तेव्हा.बायकोला म्हणलो सुद्धा.आठवतंय ना हॉस्टेलला माझ्या घरून
कशाचाही डबा आला कि सगळ्यात आधी तू लंपास करायचास?
“अरे हो,पण परत देताना
बरोब्बर अर्धा शिल्लकही ठेवायचो ते नेमकं वहिनीला सांगितलं नसणार तू?”
‘हाहाहा’. ये रात्री घरी,आज
मी ठेवतो तुझ्यासाठी अर्धे लाडू शिल्लक.’
“हाहाहा.त्यावेळी मावशीनी
केलेले लाडू पहिल्यांदा हातात लागले असते तर ठेवले असतेस का माझ्यासाठी?आणि आता न
ठेवायला काय झालंय तुला?साल्या आता तू अमेरिकेत जावून कॅलरी कॉशस वगेरे झाला असणार
ना! त्यातून लीडिंग सर्जन...काय ?”बर ते जावूदे.मी आत्ता वेगळ्याच कामासाठी
फोन केलाय तुला.”
‘आज्ञा करा मिस्टर रोल नंबर
एटीन.’
“अरे किश्या,माझा एक
जवळच्या माणसाला अॅडमीट केलंय तुझ्या हॉस्पीटलला.आणि केस पण तूच बघतोयस असं समजलं.”
‘बापरे ,कोण रे?
“तानाजी गवळी,ऑफिसमधला आहे रे
आपल्या.चांगला आहे पोरगा.घरचाच आहे समज.”
‘ओह्ह माय गॉड,ती केस?बरीच
क्रिटीकल आहे रे शेखऱ्या,बट वी आर ट्राइंग हार्ड,आतातर तू आहेस म्हणल्यावर काही
प्रश्नच नाही.पण मग तू कुठे होतास २-३ दिवस?त्याची बायको एकटीच बसलेली दिसत होती
इथे.घरी दुसरं कोणीच नाहीये म्हणे त्याचं?
“अरे मी पण सिंगापूरला होतो
आठवडाभर.आजच आलोय सकाळी ऑफिसला,त्यावेळी समजलं मला.ते सांगतो नंतर.मला एक सांग हा
तुझ्या हॉस्पिटलला बिलपेमेंटचा इश्यू काय असतो रे येवढा?आमच्या माणसांना बरंच
उलटसुलट ऐकवलं तुमच्या माणसांनी.बिल मी काढून देतो हॉस्पिटलचं.यु डोंट वरी.फक्त
त्यासाठी उपचार नका थांबवू यार”.
‘अरे आजकाल डॉक्टरच्या
हातात कुठे असतात ह्या गोष्टी?आणि मॅऩेजमेंट म्हणजे कशी असते माहित्ये ना तुला?तसच
असत रे ते.पण ते सोड तू आता,मी सांगून ठेवीन.भेटतोयस कधी ते सांग लेका? रीयुनियनला
जेमतेमच भेटलो होतो आपण.’
“अरे कधी काय आजच
संध्याकाळी येतो हॉस्पिटलमध्ये.पेशंटला पण बघायचं आहेच.”
‘ओके ये,थांबतो मी इथेच.चल
भेटू’
चला आता ऑपेरेशन यादव ...
“हाय टीना आय अॅम विथ यादव नाऊ.मोस्टली
विल नॉटबी इन केबिन टुडे”
“हलो अंदर आ सकता हू यादव
सहाब?
‘अरे मालिक धन्यभाग
हमारे,आईये आईये,बैठीये प्लीज,कॉफी फौरन मंगवाऊ?बस आपके लिये रुका हू’
जस्ट अ सेक’
‘सेंड टू कॉफी इन’
हा बोलिये सहाब,हमारे लिये
क्या लेके आये सिंगापोरसे ?
“हाहाहा”
‘जोक्स अपार्ट,ऐसी नयी चीजे
सबसे पहेले देखनेको जाना हो तो बास सिंगापोर,टचवूड’
“हां,बिलकुल सही है”
‘खैर छोडो,लेट्स कम टू
पॉईंट,सो व्हॉटअबौट मिरचंदानी?क्या किया जाय?’
“करना क्या है यार? उसकी तो
आदत है,हम दोनोमेसे एक को पकडके हर बार अपनी प्राईस लेताही है,लेकीन इस बार वी नीड
बी युनायटेड”
‘येस ऑफकोर्स,आपही लीड
लेलो,मै केह्दुंगा के प्राईसका इश्यू आप जोशीसहाबसे डीस्कस करलो,विल इट बी फाईन?’
“कोई दिक्कत नै,लेकीन अगर
आपको लीड लेना हो तो ..”
‘अरे कहां सहाब मुझे फसा
रहे हो आप?यु नो हिम बेटर,आखिर सिनियर तो आपही हो यहाके?’
आयला इथे आठवते का ह्याला
सिनियोरीटी?आणि इतरवेळी परस्पर डीसिजन घेवूब मोकळा,आताही आपण टेंडर मिळवल्यानंतर
रिपोर्ट हा करेल आणि क्रेडीट घेवून जाईल.काय करावं?
“यादवसहाब,आय सजेस्ट,हाऔ
अबौट ईफ धिस टाईम वी विल चेंज आवर रोल्स?आय विल कीप रिपोर्ट टू एचओ.और आप
मिरचंदानीसे रेटके बारेमे डीसीजन लेलो?वैसे तो आपही ब्रांचहेड हो.आप बोलदोगे तो एक
तऱ्हासे फायनल होगा उसके लिये.तो आगेकी टेंडरकी प्रोसिजर फास्ट करदेगा.यु नो व्हॉट
आय मीन?”
‘गॉट इट’
“ऐसेही ठीक रहेगा मेरे
खयालसे”
‘बट डू यु रिअली थिंक लाईक धिस
जोशी?’
“ऑफकोर्स यार यादव”
‘ओके ऐसेही करते है.डन’
“डन”
‘चलो इस बातपे कॉफी
होजाये,और बताव?’
“बस तुम बताव यार,हम तो थे
नही यहां,कुछ खास?”
‘अरे यार,माझ्या पोरीला
अॅक्सीडेंट झालं,तो आय व्होज अल्सो बिझी?’
(आता नाटक करायची खरी वेळ
आली)
“अरेयार .आत्ताच कोणीतरी
म्हणल मला.मी विसरलो आल्यावर विचारायला? हौ इज शी नाऊ
अॅक्सीडेंट कसा झाला?”
‘अरे यार,ती स्कूलमधून येत
होती,अचानकसे कुठल्या गाडीने येवून रस्त्यामंधीच तेला ठोकर मारली.बट नाऊ शी इस
फाईन’
“अरे यादव,मी ऐकलं आपला
प्यून तानाजी तिला आणायला गेला होता?रिअली?”
‘अरे हां यार थोडा..ते
दिवशी घरची गाडी गराजमंधी रीपेरला गेली होती ,वाईफबी बिझी होती.जरा रीलायबेल आदमी
है.म्हणून पाठवला,बघ ना काय करून ठेवला?
“म्हणजे चूक तानाजीची होती?पक्का?”
‘बिलकुल.ऑफीसमंधी कोनी काय
बोलला काय?’
“यार,हे बघ यादव.. पोरगी तर
लहान आहे.पण तिनी काही केलं तर जवाबदार तर आपण असतो ना?
‘हां बिलकुल.तभितो..देखो
ना,मी सोता दस हजार हॉस्पिटलमंधी भरले.वरती पोलीसला पण सगळ सांभाळायला लागलं वो
अलग
“यादव,एक बोलू का ?देखो गलत
मत समझना”
‘हां सर बिलकुल बोलिये’
“सी यादव,अॅक्सीडेंटच्या
बद्दल मला सगळं समजलंय”
‘ओह्ह’
“बघ,तू कंपनीच्या माणसाला
ऑफिसच्या वेळेत घरच्या कामासाठी पाठवलास,त्याचा अॅक्सीडेंट तुझ्या मुलीच्या चुकीनी
झाला आणि आता तो सिरीयस आहे.त्यामुळे जवाबदारी तर तुझीच आहे ना मॉरली?हि गोष्ट एचओला
समजली तर तुझी ट्रान्स्फर कुठेहे होवू शकते हे माहित्ये ना?सोच लो.”
‘अरे यार जोशी,पण गाडीखाली
आला ह्यात तर त्याचीही चूक आहे ना..?’
“बघ यादव,आता बास झालं.एकच
सांगतो तानाजीची चूक एकच आहे त्याने तुझ्या मुलीला वाचवायचा प्रयत्न केलाय.आणि
सगळी केस मला नीट माहित्ये.त्यामुळे आता कुठलेही मलातर कुठलेच कारण देवू नकोस”
‘बघ जोशी,माझी तुझी काही
दुष्मनी नाय.तू ही गोष्ट कोणाला बोलू नको’
“यादव मला बाकी काही माहित
नाही.पण ह्यात ऑफिसचे नुकसान आहेच.त्यामुळे काही झालंतर मला वरती रिपोर्ट करायलाच
लागेल.त्यापेक्षा आत्ता तुझे काही पैसे जातील.पण माणसाचा जीव वाचेल.”
‘जोशी हे बरोबर नाय हां.तू
आपल्या कलीगला त्या प्यूनकरता बदनाम करणार? धिस इज नॉट डन यार ‘
“यादव,एक लक्षात .घे तो
पोरगापण आपलाच आहे,त्याच्या आयुष्याचा सवाल आहे.तू एक कामा कर,तू त्याच्या सगळ्या उपचाराची
जवाबदारी उचल.त्याला अधेमध्ये काही झालं तर त्याच्या बायकोला त्याच्याजागी आपल्या
ऑफिसमध्ये कामाला लावून घ्यायची कबुली दे,मी हे प्रकरण वरती नेत नाही.”
‘लुक जोशी,हे नियमात बसत
नाय.’
“यादव,नियमाच तू मला सांगू
नकोस.ऑफिसमधल्या प्युनला घरच्या कामासाठी पाठवणे पण आपल्या नियमात बसत नाही,हे लक्षात
ठेव.तो माणूस प्यून जरूर आहे,पण ऑफिसकरता काय वाट्टेल ते करतो तो.त्या मावळ्याला
मी तुझ्या एका चुकीमुळे फुकट मरून देणार नाही”
‘व्हॉट मावळा? म्हणजे काय ?
‘
“जावूदे यादव,वो समझाना
तेरे बस कि बात नही,साले तुम्ही कायम मोगलांना राजे मानत आलात ना हाच तुमचा
प्रॉब्लेम आहे.बेसिकमधेच गडबड असताना मी काय बोलणार ?
फायनल सांगतो,आयदर त्याची
सगळी जवाबदारी घेणार हे मला लिहून दे,नाहीतर मी आत्ताच्या आत्ता वरती रिपोर्ट करतो.आय
थिंक यु नो माय रेलेशंस विथ रेड्डीसाब ? “
‘जोशी,चल छोड यार.घेतली
सगळी जिम्मेदारी,टेक माय वर्ड .यार लेकीन तू एक प्युनके लिये मुझसे लडेगा ये मैने
कभी सोचाभी नहीथा यार.एक बात है तुम मराठी लोगोमे जब एक होतेहो ना; तो बहोत जिगरसे
लडते हो.हॅटस ऑफ टू यु पिपल ‘
“छोड यार यादव.शिवाजी
महाराजांची माणस आहोत आम्ही.तानाजींची कदर आम्ही नाही करणार तर कोण करणार?फक्त एक
व्हायचं असतं तिथेच घोडं पेंड खातं आमचं आजकाल”.
काय खरय ना ?
समाप्त
©अंबर कर्वे
#कथा_भाग_2